remove officers who become obstacles : Bapat | Sarkarnama

पुण्याच्या विकासात अडथळा बनणाऱ्या अधिकाऱ्यांना दूर सारा : बापट 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 जुलै 2017

पुण्यासाठी योजनांची कमतरता नाही. निधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पालकमंत्री म्हणून मी आणि इतर लोकप्रतिनिधींनीही आता योजनांच्या अंमलबजावणीत लक्ष घालण्याची गरज आहे. काम न करणाऱया अधिकाऱयांना दुर सारण्याची वेळ आल्याचा इशारा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. 

पुणे : पुणे शहराच्या विकासाच्या योजनांची वेळेत अंमलबजावणी व्हावी. अशा योजना राबविण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून सामूहिक प्रयत्न हवेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सांगितले. योजनांसाठी अंमलबजावणीसाठी निश्‍चित धोरण आणि गतिमानताही ठेवली पाहिजे. असा अडथळा बनणाऱ्या अधिकाऱ्यांना दूर सारायला हवे, असा इशारा त्यांनी दिला. 

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत बापट बोलत होते. शहर, पिपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आमदारांचे प्रश्‍न जाणून घेतल्यानंतर त्यात लक्ष घालण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले. 

बापट म्हणाले, ""प्रत्येक मतदारसंघातील प्रश्‍न सुटल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ते सोडविण्याकरिता, योग्य नियोजन करण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक आमदाराची आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्याकरिता एकवाक्‍यता असली पाहिजे. विविध योजनांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे 
विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. मात्र, विकासकामांसाठी निधीची उपलब्ध करण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. अशा कामात सरकारी यंत्रणा आड येत असेल तर, त्याबाबत बोलले पाहिजे. या यंत्रणेतील कोणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही. कामे करीत नाहीत, त्यांना धडा शिकवला पाहिजे.''

 

 

संबंधित लेख