relatice ill legal construction corporator will terminate | Sarkarnama

नातेवाईकांनीही अतिक्रमण केल्यास नगरसेवक, ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पिंपरी : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार आता नगरसेवकाच्या मुलाने किंवा वडिलांनी जरी अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. 

याआधी केवळ नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास त्याचे नगरसेवकपद रद्द होत असे. 

आता त्यामध्ये नगरसेवकाच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. तसाच नियम आता ग्रामपंचायत सदस्यांसाठी करण्यात आला आहे. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याने किंवा त्याच्या मुलाने किंवा वडिलांनी अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द केले जाणार आहे. 

संबंधित लेख