रेखाताई खेडेकर पुन्हा भाजपच्या वाटेवर; चिखली मतदारसंघाची केली मागणी

रेखाताई खेडेकर पुन्हा भाजपच्या वाटेवर; चिखली मतदारसंघाची केली मागणी

पुणे : दोन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये भाजप प्रवेश करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली असून गेली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविलेल्या रेखाताई खेडेकर यांनी पुन्हा भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. त्या चिखली या आपल्या मूळच्या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत.

खेडेकर या भाजपकडूनच चिखलीतून तीन वेळा आमदार झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. त्यांना तेथे पराभवाचा सामना करावा लागला. आता भाजपची ताकद वाढल्याने त्यांनी पुन्हा याच पक्षाकडे चाचपणी सुरू केली आहे.

आपण मूळच्या भाजपच्या असल्याने आणि भाजपची त्या काळी एवढी ताकद नसताना आपण येथून विजय मिळवला असल्याने या वेळी आपल्या नावाचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. 

गेल्या दोन निवडणुकांत चिखली मतदारसंघातून काॅंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये या मतदारसंघासाठी तीव्र चुरस आहे. या स्पर्धेत खेडेकर यांचीही भर पडली आहे. त्यामुळे येथील आधीचे इच्छुक आणि त्यात खेडेकर यांच्यासारख्या दिग्गज महिला नेत्याने भाजपकडून प्रयत्न सुरू केल्याने येथील उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com