रेखाताई खेडेकर आता 2019 ला कोणता झेंडा हाती घेणार? 

रेखाताई खेडेकर आता 2019 ला कोणता झेंडा हाती घेणार? 

अकोला : मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज तयार करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कंबर कसली आहे. रेखाताईंच्या वाढदिवसांच्या निमित्याने चिखली विधानसभा मतदारसंघात लागलेल्या शुभेच्छा फलकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते (कै.) गोपीनाथ मुंडे, राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या फोटोसह "मिशन 2019' अशा टॅंग लाईनचे पोस्टर झळकल्याने रेखाताई राष्ट्रवादी की भाजप यापैकी कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. 

सामाजिक चळवळीतून सक्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या रेखाताई खेडेकर ह्या बुलडाणा जिल्ह्यातील बड्या नेत्यांमध्ये गणल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले त्यांचे पती पुरुषोत्तम खेडेकर यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि त्या माध्यमातूनच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यावर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजयी पताका फडकविली. 

त्यानंतर या मतदारसंघाचे त्यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्व केले. मात्र, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधत सिंदखेडराजा मतदारसंघातून निवडून लढविली. मात्र, या निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसला आणि शिवसेनेचे शशिकांत खेडेकर विजयी झाले. 

रेखाताईंनी पराभवानंतर खचून न देता पुन्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्त्यांची फौज तयार करीत आगामी चिखली विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याने या मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यासमोर रेखाताईंचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. 

रेखाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्याने संपूर्ण मतदारसंघात लागलेल्या शुभेच्छा फलकांवर "मिशन 2019' अशी टॅंग लाईन लिहण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर शरद पवार, (कै.) गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांचे फोटो लावण्यात आल्याने रेखाताई राष्ट्रवादी कॉंग्रेस की भाजप? यापैकी कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेंना उधान आले आहे. 

संभाजी ब्रिगेडचाही पर्याय 
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेल्या रेखाताई खेडेकर यांचे पती पुरूषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडनेही आता राजकीय मैदानात उडी घेतली आहे. रेखाताई खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे संभाजी ब्रिगेडचे महासचिव आहेत. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी सोबतच रेखाताईंकडे संभाजी ब्रिगेड हाही सक्षम पर्याय आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com