Register a case against Subhash Deshmukh: Sanjay Nirupam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सुभाष देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा :  संजय निरूपम

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

अनुदानाबाबत लोकमंगल संस्थेसोबत झालेला 42.81 कोटींचा करार दुग्धविकास आयुक्तांनी रद्द केलेला आहे व लाटलेला 5 कोटी रुपयांचा निधी परत करण्याचे आदेश आयुक्तांनी सुभाष देशमुख यांना दिले आहेत.

मुंबई :  " सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीने दुग्धशाळेचे विस्तारीकरण आणि दूध भुकटी प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रे दाखवून 5 कोटींचे अनुदान लाटल्याचे उघडकीस आल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा ", अशी  मागणी मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी  राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे .  

"अनुदानाबाबत लोकमंगल संस्थेसोबत झालेला 42.81 कोटींचा करार दुग्धविकास आयुक्तांनी रद्द केलेला आहे व लाटलेला 5 कोटी रुपयांचा निधी परत करण्याचे आदेश आयुक्तांनी सुभाष देशमुख यांना दिले आहेत. मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व बनावट कागदपत्रे दाखवून सरकारचा निधी लाटला आहे ,"असा आरोप निरूपम यांनी केला.

"त्यामुळे सरकारची फसवणूक करणाऱ्या सुभाष देशमुख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, असे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेत," असे निवेदन संजय निरुपम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांना दिले.

संजय निरुपम म्हणाले की, "राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लोकमंगल सोसायटीने दुग्धशाळा विस्तारीकरण व दूधभुकटी प्रकल्पासाठी साहाय्य मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. काही दिवसांपूर्वी अनुदान मिळवण्याकरिता सुभाष देशमुख आणि त्यांचा मुलगा रोहन देशमुख यांनी बनावट कागदपत्रे दाखवून अनुदान मिळवले आणि लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या नावाखाली 5 कोटी रुपये  लाटले."

 

 

संबंधित लेख