Red Gram loaded vehicles que | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अमरावतीत तूर विकण्यासाठी पाच किलोमीटरची रांग 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही रांगेत राहावे लागत असून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पाच किलोमीटर एवढी लांब वाहनांची रांग लागली आहे. 

नागपूर : तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही रांगेत राहावे लागत असून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पाच किलोमीटर एवढी लांब वाहनांची रांग लागली आहे. 

सर्व केंद्रांवर नवीन तूर खरेदी सुरू होऊ न शकल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे. ज्या तालुक्‍यातील बाजार समितीत नाफेडचे केंद्र नाही; अशा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी आणल्यास ती स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गेल्या दोन दिवसांपासून तूर भरलेल्या वाहनांची रांग लागली आहे. अचानक आवक वाढल्याने तूर ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम नसल्याने शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास टाळाटाळ सुरू आहे. 

नाफेडच्या तूर खरेदीस पुन्हा प्रारंभ होणार असल्याने घरातील तूर शेतकऱ्यांनी बाहेर काढली आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील दहाही बाजार समितीच्या केंद्रांवर तुरीची आवक अचानक वाढली व वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवीन तूर खरेदीसाठी जागा नसल्याने खरेदी सुरू होऊ शकली नाही.

दरम्यान जिल्ह्यातील चांदूर बाजार केंद्र सुरू झाले असून शुक्रवारी (ता.12) नांदगाव खंडेश्‍वर, चांदूरेल्वे व वरुड ही केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी अशोक देशमुख यांनी दिली. अमरावतीसह मोर्शी, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर येथील केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. 

संबंधित लेख