rec blood farmer mungantiwar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

लाल दिव्यावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम : मुनगंटीवर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई : आम्ही सत्तेवर नाही, सत्यावर प्रेम करणारे, लाल दिव्यावर नाही तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम करणारे आहोत. इतर विभागाच्या कामामध्ये निधी देताना मी काटकसर करत असेन, मात्र सरकारच्या तिजोरीवर सर्वात पहिला हक्क अन्नदात्याचा, शेतकऱ्यांचा आहे, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी व्यक्त केला. 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित कर्जमाफी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. 

मुनगंटीवार म्हणाले, "" कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात यापूर्वीच 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यासाठी असलेल्या 21 हजार कोटींचा अर्थसंकल्प आम्ही 36 हजार कोटींवर नेला. कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात शंका असतील मात्र या प्रश्नावर राज्यात राजकारण होऊ नये. हा शेतकाऱ्यांचा सरकारला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आशिर्वात आहे. या निर्णयासाठी सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला नाही, करणार नाही. जुलैच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद असते त्यातील निधी अनुसूचित जातीसाठीची तरतूद असते. ही सुपीक डोक्‍यातून आलेली नापीक कल्पना आहे.'' 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, "" शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कर्जमाफीसाठीचा आग्रह धरला होता. तो मान्य केला आणि देशातली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कर्जमाफी केली, याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो.''  

संबंधित लेख