रावसाहेब दानवेंनी मतदारसंघात साजरी केली शिवजंयती, मिरवणूकीत खेळले फुगडी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मतदारसंघातील भोकरदन येथे उत्साहात साजरी केली. मिरवणूकीत सहभागी होत दानवे यांनी टाळ वाजवत फुगडीही खेळली.
Ravsaheb Danve celebrating Shivjayanti
Ravsaheb Danve celebrating Shivjayanti

भोकरदन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मतदारसंघातील भोकरदन येथे उत्साहात साजरी केली. मिरवणूकीत सहभागी होत दानवे यांनी टाळ वाजवत फुगडीही खेळली.

संपुर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोचला आहे. राजकारण्यांनी देखील आपापले मतदारसंघ गाठत शिवरायांना अभिवादन केले. रावसाहेब दानवे यांनी सकाळीच भोकरदन येथील आपल्या संपर्क कार्यालयात शिवजंयती साजरी केली. शहरातील मुख्य चौकात असलेल्या शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करत अभिवादन केले.

त्यानंतर फत्तेपूर गावातील शिवजयंती मिरवणूकीत दानवे सहभागी झाले. गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत दानवे यांनी टाळ वाजवत सहभाग नोंदवला. वाजत गाजत निघालेल्या या मिरवणूकीत कार्यकर्त्यांनी आग्रह करताच दानवे फुगडीही खेळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com