ravsaheb danave bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

खडसे यांच्या कमबॅकबाबत पक्षात कुठलीही चर्चा नाही : रावसाहेब दानवे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई : माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांची लवकरच मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा असली तरी, पक्षामध्ये खडसे यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकबाबत कुठलीही चर्चा नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. 

मुंबई : माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांची लवकरच मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा असली तरी, पक्षामध्ये खडसे यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकबाबत कुठलीही चर्चा नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीचा भुखंड गैरव्यवहार प्रकरणाचा ठपका ठेवल्यानंतर एकनाथ खडसे यांना जून 2016 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भोसरी येथील भुखंड व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोंटिग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. 

मंत्रिमंडळातील मातब्बर आणि ज्येष्ठ मंत्री असलेल्या खडसे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतरही गेले वर्षभर भाजपकडून त्यांच्यावर कोणतेही महत्वाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती. त्यामुळे राज्य नेतृत्वातील प्रमुख नेते असलेल्या खडसे यांनी जळगांव जिल्ह्यातील मतदारसंघापुरताच आपले कार्य केले होते. 

अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजपची ताकद वाढवताना, सर्वांना पुढे घेवून कसे जाता येईल, याचाही विचार केला गेल्याचे समजते. त्याचवेळी भाजपातील वजनदार नेते असलेल्या खडसे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. 

भोसरी येथील एमआयडीसी भुखंड गैरव्यवहार प्रकरणात आपण कोणतेही नियमबाह्य केलेले नसल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे.त्यामुळे याप्रकरणातील सत्य बाहेर येवू द्या, असेही खडसे यांचे म्हणणे आहे. 

मात्र, 24 जुलै 2017 पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात खडसे यांची पुन्हा वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, या चर्चेबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. खडसे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देणार याबाबत पक्षपातळीवरही कोणतेही चर्चा नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख