ravsaheb danave against all party | Sarkarnama

माझ्या विरोधातील चांडाळ चौकडीला पुरून उरेन - रावसाहेब दानवे

तुषार पाटील
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

भोकरदन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जसे सगळे विरोधी पक्ष एकत्रित आले आहेत, तशीच काहीशी परिस्थिती माझ्या जालना जिल्ह्यामधील नेत्यांची आहे. पण या चांडाळ चौकडीला मी पुरून उरेन असा सणसणीत इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना दिला. आमदार बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा नुकतीच अमरावतीमधील पत्रकार परिषदेत केली. या पार्श्‍वभूमीवर दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता अशा " चिल्लर' लोकांना मी महत्व देत नसतो अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. 

जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे, गेल्या तीस वर्षात मी स्वतः चारवेळा, उत्तमसिंग पवार आणि पुंडलिक हरी दानवे प्रत्येकी एकदा निवडून आलेले आहेत. गावागावातील तळागाळापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे गेलेले आहे. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या साडेतीन वर्षात वन बुथ 25 युथच्या माध्यमातून राज्यभरात मजबुत संघटन उभे केले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात 48 हजार बुथ केंद्रापर्यंतच्या कार्यकर्त्यांची फौज आम्ही निर्माण केली आहे. 

या शिवाय डीएमआयसी, ड्रायपोर्ट, मतदारसंघात सहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे गेल्या चारवर्षात मी केली, याची पावती म्हणून मतदार येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजपच्या पाठीशीच भक्कमपणे उभे राहतील. शिवसेना माझ्या विरोधात लढण्याची भाषा करते आहे पण त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा नाही. त्यामुळे मतदारसंघात केलेली विकास कामे आणि कार्यकर्त्यांची ताकद या जोरावर मी पुन्हा विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला. 

शिवसेनेचे आमदार राज्यमंत्री अर्जून खोतकर, सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार बच्चू कडू यांनी दानवे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. बच्चू कडू यांची दखलच घ्यायची नाही असे धोरण रावसाहेब दानवे यांनी स्वीकारल्याचे बोलले जाते. त्यामुळेच जालन्यातून लढण्याची घोषणा केल्यानंतरही दावने यांनी या संदर्भात कोणतेच विधान केले नव्हते. 

पण आता या सगळ्यांचा " चांडाळ चौकडी ' असा उल्लेख करत त्यांचे आव्हान आपण स्वीकारल्याचे रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिले आहे. आता दानवे या चांडाळ चौकडीला पुरून उरतात की ही चौकडीच त्यांना चकवा देते हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल. 
 
संबंधित लेख