ravsaheb danave | Sarkarnama

आरक्षण न्यायालयातही टिकेल - रावसाहेब दानवे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन करून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाचेही अभिनंदन करून या समाजाने सरकारला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. 

मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधिमंडळात संमत केल्यावर प्रतिक्रीया दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे आरक्षण न्यायालयात टिकेल का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले सरकारने यासंबंधातली सर्व काळजी घेतली आहे. जर हा प्रश्‍न न्यायालयात गेलाच तर सरकार तिथे न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडून हे आरक्षण टिकवून ठेवेल असेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख