आयर्नमॅन रवींद्र सिघलांची कन्याही आता 'आयर्नगर्ल' 

एकोणीस वर्षीय रविजा सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिने रविवारी (ता.2) ऑस्ट्रेलियाची 'आयर्नमॅन' स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. रविजा राष्ट्रीय जलतरणपटू आहे. रविजाने 'ऑस्ट्रेलियन आयर्नमॅन' स्पर्धा 15 तास 54 मिनिटांमध्ये पूर्ण केली. स्पर्धेत चार किलोमीटर अंतराचे पोहोणे, 180.8 किलोमीटर अंतराचे सायकलिंग आणि 42 किलोमीटर अंतर धावण्यासाठी 16 तासांची निर्धारित वेळ असताना रविजा हिने हे अंतर 15.54 तासांत पूर्ण करून इतिहास घडविला.
आयर्नमॅन रवींद्र सिघलांची कन्याही आता 'आयर्नगर्ल' 

नाशिक : फ्रान्सची खडतर स्पर्धा यशस्वी करुन 'आयर्नमॅन' हा किताब पटकावणारे नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची कन्या रवीजा आपल्या पित्याच्या पावलांवर पाऊल टाकत नुकतीच ऑस्ट्रेलियात झालेली अशीच खडतर स्पर्धेत झेंडा फडकवत सर्वात लहान वयाची 'आयर्नगर्ल' ठरली आहे.

एकोणीस वर्षीय रविजा सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिने रविवारी (ता.2) ऑस्ट्रेलियाची 'आयर्नमॅन' स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. रविजा राष्ट्रीय जलतरणपटू आहे. रविजाने 'ऑस्ट्रेलियन आयर्नमॅन' स्पर्धा 15 तास 54 मिनिटांमध्ये पूर्ण केली. स्पर्धेत चार किलोमीटर अंतराचे पोहोणे, 180.8 किलोमीटर अंतराचे सायकलिंग आणि 42 किलोमीटर अंतर धावण्यासाठी 16 तासांची निर्धारित वेळ असताना रविजा हिने हे अंतर 15.54 तासांत पूर्ण करून इतिहास घडविला. 

दोन वर्षांपासून रविजा डॉ. पिंपरीकर यांच्या जिममध्ये सराव करीत आहे. तिला मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले. ऑस्ट्रेलियन आयर्नमॅन स्पर्धेतील कामगिरीमुळे रविजा आशियातील यंगेस्ट 'आयर्नगर्ल' ठरली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी चार किलोमीटर पोहणे, बत्तीस किलोमीटर चालणे आणि 182 किलोमीटर सायकलींग अशी खडतर कामगिरी 15 तास 13 मिनीटांत पूर्ण केली होती. त्यासाठी त्यांनी नियमीतपणे व दीर्घकाळ सराव केला होता. अगदी पुणे - गोवा सायकल स्पर्धाही यशस्वीपणे पुर्ण केली होती. 

वयाच्या पन्नाशीत त्यांनी साध्य केलेले हे यश अनेकांच्या, अगदी कमांडोंच्या प्रशिक्षणातही तंदुरुस्तीसाठी आदर्श ठरले होते. यामध्ये अर्थातच त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचे प्रोत्साहन होते. वडिलांना आदर्श मानुन कन्या रवीजा हिनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत सर्वात लहान वयाची 'आयर्नगर्ल' हा किताब पटकावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com