नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची पोलिस कोठडीत रावानगी 

नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची पोलिस कोठडीत रावानगी 

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांची शुक्रवारी एक दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

 सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्त्ते यांनी गुरूवारी अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे तिघे शुक्रवारी सकाळी आज सकाली 10 वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजार झाले होते. रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन देवरकर ( वय 38, दोघेही रा. कसबा पेठ) अशा तिघांची अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी पी.  डी. सांवंत यांनी पोलीस कोठडीत रवानगी केली. याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. 


या प्रकरणात पूर्वी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात धंगेकर यांचा पुढाकार असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने धंगेकर यांचा जामीन फेटाळला. 

पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यावेळी महापौरांनी आंदोलकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना फोन करून आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. निंबाळकर यांनी निविदेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. ही निविदा जादा दराने आल्याने ती रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

त्या दरम्यान धंगेकर यांनी निंबाळकरांना उद्देशून चोर आणि भ्रष्टाचारी म्हटले. त्यावर निंबाळकर यांनीही धंगेकर यांच्याकडे बोट करून मला चोर, भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का? असे विधान केले. त्यानंतर झालेल्या वादात निंबाळकर यांना धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणात शिंदे, धंगेकर यांच्यासह अन्य 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com