Ravikant Tupkar Uses foul language | Sarkarnama

आमदारांचा बाप काढून तुपकरांनी करुन घेतला स्वतःच्या डोक्याला ताप

अरूण जैन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

खासदार राजू शेट्टी यांनी मंत्र्यांचे कपडे फाडून आंदोलनाची मारण्याची भाषा केली. यावर एका वृत्तवाहिनीने 5 आक्टोबरला चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कार्यक्रमात तुपकर, आमदार डाॅ. बोंडे, पाशा पटेल, रघुनाथदादा आदी नेते होते. बोंडे व तुपकरांच्या दरम्यान  विषयावरील चर्चेदरम्यान वादंग झाले. शाब्दिक हमरीतुमरी सुरू झाली. तुपकरांना तू माझ्या मतदारसंघात तर येऊन दाखव, असे आव्हान आमदार बोंडे यांनी दिले होते

बुलडाणा : एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिवराळ भाषेत अपमानास्पद बोलणे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. येथील आमदार डाॅ. अनिल बोंडे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत बोलून तुपकर यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली.

खासदार राजू शेट्टी यांनी मंत्र्यांचे कपडे फाडून आंदोलनाची मारण्याची भाषा केली. यावर एका वृत्तवाहिनीने 5 आक्टोबरला चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कार्यक्रमात तुपकर, आमदार डाॅ. बोंडे, पाशा पटेल, रघुनाथदादा आदी नेते होते. बोंडे व तुपकरांच्या दरम्यान  विषयावरील चर्चेदरम्यान वादंग झाले. शाब्दिक हमरीतुमरी सुरू झाली. तुपकरांना तू माझ्या मतदारसंघात तर येऊन दाखव, असे आव्हान आमदार बोंडे यांनी दिले. 

योगायोगाने याच दिवशी मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानीशेतकरी संघटनेची दुष्काळ परिषद होती. या परिषदेत तुपकरांचे जोशपूर्ण भाषण सुरू होते. टाळ्या आणि शिट्ट्या सुरू झाल्या अन् तुपकरांनी तेथील आमदार डाॅ. अनिल बोंडे यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरवात केली. मिश्किल चिमटे आणि कोट्या एकवेळ समजून घेता आल्या असत्या. पण तुपकरांनी थेट त्यांचा बाप काढून ताप करवून घेतला. नंतर आपण राजकीय बाप या अर्थाने बोललो, आपल्या बोलण्याचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला अशी भूमिका त्यांनी घेतली. 

यानंतर काल ता. 9 रोजी  अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या सुमारे  200 महिलांनी बुलडाणा गाठून तुपकर यांच्या आई वडिलांचा गांधीगिरीने सत्कार करण्याचा आग्रह धरला. परंतु, पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्यांनी असे करण्यासाठी मनाई केल्यावर जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन महिला निघून गेल्या. 
 

संबंधित लेख