ravikant tupkar mumbai news | Sarkarnama

" स्वाभिमानी 'आजही सत्तेत, तुपकरांच्या राजीनाम्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरीच नाही.. 

सुचिता रहाटे 
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींचे खंदे शिलेदार रवीकांत तुपकर अजूनही सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षच आहेत. तुपकर यांनी एक महिन्यांपूर्वी दिलेला पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला नसल्याने 'स्वाभिमानी' अजूनही तांत्रिकदृष्ट्या सरकारमध्येच आहे. 

मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून सदाभाऊ असलेल्या शेतकरी विरोधी सरकारमध्ये राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे सांगत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः राजीनामा सुपूर्द केला होता. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी तुपकरांचा राजीनामा मंजूर केला नसल्याचे समजते. सदाभाऊंची नव्याने जन्मलेली संघटना सरकारमध्ये सहभागी जरी असली तरीही बाहेर पडलेल्या 'स्वाभिमानी'लाही सोडायचे नाही, असे डावपेच सत्ताधारी भाजपकडून अवलंबले जात असल्याची असल्याची चर्चा होत आहे. 

याबाबत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा मंजूर न करण्याचे कारण अद्यापही मलाही समजू शकले नाही. परंतु मी माझ्या शासकीय सोईसुविधांचा त्याग केला असून राजीनामा दिलेल्या क्षणापासून काम करणे थांबविले आहे. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी राज्याचे दौरे करण्यास सुरुवात केली. अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नसून त्यांना 'स्वाभिमानी' ची गरज आहे. मी चळवळी मधला माणूस आहे आणि त्यांच्यातलाच एक कार्यकर्ता बनून राहणार. मी खासदार किंवा आमदार नाही झालो तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन व लढत राहीन.  

संबंधित लेख