ravikant tupkar meet balasaheb dandekar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भारिप सोबत स्वाभिमानी करणार आघाडी 

मनोज भिवगडे
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

अकोला : भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमला एकत्र घेऊन युती करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाच त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही उडी घेत आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

या संदर्भात स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी शनिवारी भारिपचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यासंदर्भात मुंबईत लवकरच बैठक होणार आहे. यावेळी स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी हे आंबेडकरांच्या भेटीनंतरच पुढील राजकीय समीकरण समोर येईल. 

निवडणुकीत बाजी मारण्यासाठी स्वाभिमानी संघटना विविध पक्षांसोबत बैठका घेत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबत काही दिवसापूर्वी बैठक झाली. हे लक्षात घेता आता स्वाभिमानीने काही पॉकेटमध्ये चांगला दम असलेल्या भारिप बहुजन महासंघासोबत चर्चेचा फड मांडला आहे. अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघाची ताकद आहे. त्यामुळेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी न झाल्यास भारिप-बमसंची मदत मिळवण्याची स्वाभिमानीने धडपड सुरू केली आहे. 

आंबेडकर आणि तुपकर यांच्यात जवळजवळ एक तास चर्चा झाली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा झाली. आघाडीसंदर्भात येत्या 6ऑक्‍टोबररोजी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी मुंबईत बैठक होईल. सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही. 
बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय नेते, भारिप बहुजन महासंघ, अकोला. 

आगामी निवडणुकांसाठी आम्ही भारिपसोबत युती करण्याच्या तयारीत आहोत. त्यासंदर्भात बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. मुख्य बोलणी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत करतील. 
रवीकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष.  

संबंधित लेख