माढ्यातील सात ते आठ दिग्गज "स्वाभिमानी'च्या वाटेवर : रविकांत तुपकर

माढ्यातील सात ते आठ दिग्गज "स्वाभिमानी'च्या वाटेवर : रविकांत तुपकर

वडुज : माढा मतदारसंघाने मागील लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगली साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचे संघटनेवर मोठे उपकार आहेत. खटाव व माण तालुक्‍यांना व येथील जनतेला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. या मतदारसंघातील सात ते आठ दिग्गज नेते लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांनी आज वडुज येथे पत्रकार परिषदेत केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येत्या शुक्रवारी (ता. 29) पुणे येथे कैफियत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांची माहिती त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, देशातील सर्वसामान्य व गोरगरीब जनता, शेतकरी वर्गाला विविध आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र सत्ता मिळताच ऊस व दूध दरामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आम्ही कैफियत मोर्चा काढणार आहोत. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्‍ते अनिल पवार, जिल्हा संघटक श्रीकांत लावंड, तालुकाध्यक्ष सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. 

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुण्यातील अलका टॉकीजपासून या मोर्चाला सुरवात होऊन तो साखर संकुलावर नेण्यात येणार आहे, असे सांगून श्री. तुपकर म्हणाले, ""चार वर्षांपूर्वी अच्छे दिनचे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आले. मात्र देशातील सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गाला अच्छे दिन दाखविण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. देशातील विविध समस्यांबरोबरच दुधाचे दर कमालीचे कमी झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एफआरपीची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे एकप्रकारे हे सरकार शेतकऱ्यांना शेतीमधून बाहेर पडायला लावून त्याजागी मोठ्या उद्योजकांना काम देण्याचा घाट घालत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com