ravikant tupkar about raju shetty election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

स्वतः मोदी हातकणंगल्यात लढलेतरी शेट्टींचा विजय पक्‍का! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

स्वाभिमानी विरोधात दिशाभूल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून रसद पुरवून कुरघोडी करण्याचा डाव सुरु आहे.

इस्लामपूर (सांगली) : स्वाभीमानीतील बंडखोर आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. 

ते म्हणाले," स्वाभिमानी पक्षात फुट पडली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतु ज्यांनी बंडखोरी केली ते मुळात अनेक वर्षापासून संघटनेपासून दूर आहेत. स्वाभिमानी विरोधात दिशाभूल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून रसद पुरवून कुरघोडी करण्याचा डाव सुरु आहे. खासदार राजू शेट्टी चळवळीतून पुढे गेलेले नेते आहेत. संघर्ष हा स्वाभिमानीच्या पाचवीला पुजलेला आहे. शेट्टी यांच्या विरोधात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लढले तरी शेट्टींचा विजय पक्‍का आहे. आमचे तसे जाहीर आव्हान आहे. मोदींनी स्वतः येऊन लढावे.'' 

संबंधित लेख