ravikant tupkar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

रविकांत तुपकरांनी तडकाफडकी महामंडळाची गाडी परत केली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

बुलडाणा : ठरल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. याची औपचारिकता नंतर पूर्ण होणार असली, तरी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मात्र महामंडळाकडून मिळालेले अधिकार व सुविधा सोडल्या आहेत. निर्णयानंतर ते बसने पुण्याहून बुलडाण्याकडे रवाना झाले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. संघटनेच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्‍त करुन ज्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही तेथे राहण्यात अर्थ नाही अशा भावना व्यक्‍त करण्यात आल्या. 

यानंतर संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी आपण सरकारमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. भाजपशी जवळीक साधलेले सदाभाऊ खोत वगळता वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद रविकांत तुपकरांकडे होते. यानिमित्तानेच संघटना सरकारमध्ये सामील होती. तसे पाहिले तर हे अध्यक्षपदही सर्वसामान्य कार्यकर्ते व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने निरुपयोगीच होते. त्यामुळे संघटनेने तातडीने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी तातडीने महामंडळाची गाडी परत पाठविली. मिळालेले निवासस्थान देखील तातडीने सोडत असल्याचे सांगीतले आणि ते बसने पुण्याहून बुलडाण्याकडे रवाना झाले. 
 
संबंधित लेख