ratnagiri zp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भ्रष्ट प्रशासनामुळे सरपंचावर आत्मदहनाची वेळ ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

जिल्हा परिषद आत्मदहन नाट्य सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिश्रा हे आपल्या नियमित बैठकांमध्ये व्यस्त होते. तब्बल दीड तासाहून अधिक काळ आत्मदहन करणारे ग्रामस्थ आणि पोलिस सीईओंच्या केबिन बाहेर ताटकळत होते. अखेर पोलिसच कंटाळले. त्यांनीही या विषयाचे गांभीर्य सीईओपर्यंत पोचविण्यासाठी शिपायांना सूचित केले. तरीही त्यांना बोलाविण्यास सीईओंकडून उशीर लावण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढतच होता. 

रत्नागिरी : वायंगणे (ता. संगमेश्‍वर) येथील विकासकामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेनी दिले होते. त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थाने आत्मदहनासाठी रॉकेलच्या बाटल्या घेऊन जिल्हा परिषदेकडे धाव घेतली; मात्र याची कल्पना पोलिसांना असल्याने त्यांनी हा प्रकार रोखला. 

वायंगणे येथील पूर्वीचे सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या 36 लाख राष्ट्रीय पेयजल योजनेसह 2012 ते 2016 मध्ये विविध कामांत भ्रष्टाचार केल्याचे लेखा परीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कारवाईसाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही. पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. परंतु गेली सहा वर्षे तेथील ग्रामस्थ पाणी-पाणी करत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी सरपंच सुरेश घडशी यांनी केली होती. याची गांभीर्याने दखल न घेतल्याने घडशी यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अखेर 8 मे रोजी सीईओंना निवेदन देत सरपंच घडशी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 

वायंगणे सरपंच घडशी सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांच्याबरोबर ग्रामस्थ संजय नवाले, अविनाश गोंधळी, गंगाराम कांबळी, निलेश घडशी आदी उपस्थित होते. त्यांच्या बॅगेत रॉकेलच्या दोन बाटल्याही होत्या. श्री. घडशी यांनी जिल्हा परिषदेत पाऊल ठेवले. सीईओंच्या दालनासमोर सर्वजण उपस्थित झाले. कोणतेही गैरकृत्य घडशी यांच्या हातून होऊ नये, यासाठी पोलिसांनी घडशींकडील रॉकेलच्या बाटल्या आधीच जप्त केल्या. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन पोलिसांनी दिले. दुपारपर्यंत ग्रामस्थांसह सर्वजण ताटकळत उभे होते. पुढे त्यांना आश्‍वासनाशिवाय काही मिळाले नाही. 

 

फोटो फीचर

संबंधित लेख