नवीन चेहर्‍यांचा मुंबई पॅटर्न जिल्हा परिषदेत

रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात उमेदवार निवडीचा खल सुरु होता. संपर्कप्रमुखांसह आमदार, पदाधिकारी या बैठकिला उपस्थित होते. शेवटपर्यंत साळवी की सावंत यावर चर्चा येऊन ठेपली होती. त्यात पहिली संधी रत्नागिरीला देण्याचा निर्णय झाला. संगमेश्‍वरला उपाध्यक्षपद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुढील सव्वा वर्षांसाठी अध्यक्ष सौ. स्वरुपा साळवी आणि उपाध्यक्ष सोनू गोवळ यांना संधी दिली आहे. सव्वा वर्षानंतरचे उमेदवार घोषित करुन शिवसेनेने आणखीन एक मोठा धक्का दिला आहे.
नवीन चेहर्‍यांचा मुंबई पॅटर्न जिल्हा परिषदेत
नवीन चेहर्‍यांचा मुंबई पॅटर्न जिल्हा परिषदेत

रत्नागिरी: जिल्हापरिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेने मुंबई पॅटर्नचा अवलंब केला. याआधी सभापती निवडीतही हाच फॉर्म्यूला होता. नवीन चेहर्‍यांवर जबाबदारी टाकतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना कदर करते असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. रत्नागिरीच्या सौ. स्नेहा सावंत यांना अध्यक्ष, संतोष थेराडेंना उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली. तसेच शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच सव्वा वर्षानंतरचे उमेदवार जाहीर करुन इच्छुकांमध्ये गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत महापौरांपासून ते स्थायी समिती सभापतींची नियुक्ती करताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नवीन चेहर्‍यांना संधी दिली. मुंबईतील तगड्या इच्छूकांना धक्का बसले. हेच तंत्र शिवसेनेने कोकणासह राज्यात राबवले. रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी सुरवातीला सौ. रचना महाडिक यांचे नाव होते. संगमेश्‍वर, रत्नागिरी या तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले. लांजा-राजापूर तालुका भाजपमुक्त झाला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीत चुरस निर्माण झाली होती. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला. शिरगाव गटातून निवडून आलेल्या सौ. स्नेहा सावंत यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. भाजपा जिल्हाध्यक्ष बाळ मानेंच्या पत्नीला पराभूत करुन सौ. सावंत निवडून आल्याने त्यांना संधी मिळावी, असा आग्रह स्थानिक पातळीवरुन धरण्यात आला.

सौ. महाडिक यांनी पूर्वी अध्यक्षपदाची धूरा सांभाळलेली होती. अनुभवामुळे त्यांचे पारडे जड होते. परंतु पंधरा दिवसापुर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. कोणा एकाची मक्तेदारी राहते असा ठपका बसू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सतर्क आहेत. महाडिक यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धूरा असल्याने अध्यक्षपद दिले, तर त्यातून अंतर्गत कलहाला निमंत्रण मिळेल अशी भिती वरिष्ठांमध्ये होती. जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये संगमेश्‍वरात उमेदवारी वाटपावरुन झालेल्या बंडाची किनारही या विचाराला आहे. त्याचबरोबर रत्नागिरीला पद मिळावे यासाठी आमदार सामंत यांनीही जोरकस प्रयत्न केले होते. त्याला तेवढेच यश मिळाल्याची चर्चा सुरु आहे. या घडामोडींमुळे जिल्हाप्रमुखांसोबत संघटनेत इतरांच्या मतालाही महत्व मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com