ratnagiri council president rahul pandits announcement | Sarkarnama

रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित भैरीबुवासमोर घेतलेली शपथ पाळणार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

"होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन,' अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील, त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे,' असा खुलासा जनतेतून थेट निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आज सोशल मीडियावर केल्याने रत्नागिरीचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

रत्नागिरी : "होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन,' अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील, त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे,' असा खुलासा जनतेतून थेट निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आज सोशल मीडियावर केल्याने रत्नागिरीचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

पावणेदोन वर्षे पक्षांतर्गत वाटाघाटीची चर्चा होती. त्याला आज राहुल पंडित यांनी पूर्णविराम दिला. 

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी 2016 मध्ये निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राहुल पंडित, मिलिंद कीर आणि बंड्या साळवी यांची नावे चर्चेत होती. शिवसेनेने पंडित यांना उमेदवारी दिली. बंड्या साळवी यांनीही पूर्ण तयारी केली होती. पंडित यांना उमेदवारी दिल्याने साळवींच्या नाराजीचा निवडणुकीवर मोठा परिणाम पडणार होता. त्यांना शांत करण्यासाठी राहुल पंडित आणि बंड्या साळवी यांना दोन-दोन वर्षे नगराध्यक्षपद द्यायचे, असा अलिखित करार झाला. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवा यांच्यासमोर शपथ घेण्यात आली. सोशल मीडियावरील खुलाशानंतर आज त्याला अधिकृत दुजोरा मिळाला. डिसेंबरमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावर राहुल पंडित यांनी खुलासा केला आहे, की मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख