rashmi bagal reaction about courtmatter | Sarkarnama

2019 ला तयारीने या, मग बघूया काय होतंय ते!

संपत मोरे 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

ज्या क्षणी पराभूत झालो तेव्हाच आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे.

पुणे : ''आम्ही ज्या क्षणी पराभूत झालो तेव्हाच आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल करण्याचा आग्रह केला होता आणि त्यांचा आग्रहापोटी मी याचिका दाखल केली होती. त्यामुळे आम्हाला पराभव मान्य करा असा सल्ला देणाऱ्यांनी येत्या निवडणुकीत तयारीने यावे. आम्ही त्यांच्याशी लढत दयायला तयार आहोत, मग बघूया काय होतय ते .... "अशा शब्दांत रश्मी बागल यांनी आमदार नारायण पाटील यांना प्रतिउत्तर दिले. 

आमदार नारायण पाटील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका रश्मी बागल यांची याचिका उच्च न्यायालायाने फेटाळली. त्यावर प्रतिक्रिया देताना बागल म्हणाल्या,"पराभव पराभवच असतो आम्ही आमचा पराभव त्याक्षणीच मान्य केला आणि दुसऱ्या क्षणापासून आम्ही जनतेच्या सोबत कामाला लागलो. पराभवाने खचून गेलो नाही. पण आमच्यासाठी रात्रीचा दिवस करणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी याचिका दाखल करण्याचा आग्रह केला. शेवटी लोकांचं प्रेम महत्वाचं आहे आणि जे आपल्यासाठी राबतात ,कष्ट करतात त्यांचा आग्रह अमान्य करणं शक्य नव्हतं. म्हणून याचिका दाखल केली होती.  

संबंधित लेख