raosaheb shekhawat | Sarkarnama

आजचा वाढदिवस : रावसाहेब शेखावत, माजी आमदार, अमरावती. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव म्हणून राजकारणात आलेले रावसाहेब शेखावत यांनी अमरावती या विधानसभा मतदारसंघाचे 2009 मध्ये नेतृत्व केले आहे. शांत व संयमी स्वभावामुळे शेखावत यांनी अमरावती शहराच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2009 मध्ये त्यांनी विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांची उमेदवारी देण्याऐवजी रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रपतींचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीमध्ये शेखावत यांनी डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत मात्र शेखावत यांना यश मिळविता आले नाही. डॉ.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव म्हणून राजकारणात आलेले रावसाहेब शेखावत यांनी अमरावती या विधानसभा मतदारसंघाचे 2009 मध्ये नेतृत्व केले आहे. शांत व संयमी स्वभावामुळे शेखावत यांनी अमरावती शहराच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2009 मध्ये त्यांनी विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांची उमेदवारी देण्याऐवजी रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रपतींचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीमध्ये शेखावत यांनी डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत मात्र शेखावत यांना यश मिळविता आले नाही. डॉ. देशमुख यांनी भाजपची उमेदवारी घेऊन निवडणूक लढविली. यात शेखावत यांचा पराभव झाला. अमरावती शहरातील उड्डाण पूल व रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी काम केले होते. यामुळेच अमरावती शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात झाली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख