Raosaheb Danve's daughter Asha Pande keen to reelect brother as MLA | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

रावसाहेब दानवेंच्या कन्या आशाताई पांडे म्हणतात, भावाला पुन्हा आमदार करणार 

तुषार पाटील
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

जालना जिल्ह्यात ज्याप्रमाणे अर्जुन खोतकर यांना त्यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर, राजेश टोपे यांना बंधू सतीश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना बंधू सुधाकर दानवे मदत करतात अशीच मदत मी माझ्या आमदार लहान भावाला करते असे  आशाताई   पांडे म्हणतात."2019 ला संतोषला पुन्हा आमदार करणे हीच माझ्यासाठी भाऊबीज ची भेट राहील", असे त्या सरकारनामाशी बोलताना म्हणाल्या.

भोकरदन: भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे गेल्या 35 वर्षांपासून भोकरदन मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखून आहेत.  2014 च्या निवडणुकीत मुलगा संतोष दानवेला आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात आणले.  तसेच त्यांच्या ज्येष्ठ कन्या सौ . आशाताई  पांडे या देखील भावापाठोपाठ राजकारणात आल्या. 

'दगडवाडी' या त्यांच्या सासरच्या गावी त्या सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यानंतर दीड वर्षात त्या सोयगाव देवी या सर्कलमधून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. अल्पावधीतच त्यांनी भोकरदन- जाफराबाद विधानसभा मतदारसंघावर आपली वेगळी छाप निर्माण केली.

 रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या प्रमाणेच आशाताईंनीही कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. मनमिळावू स्वभाव व प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधून आमदार कार्यालयावर येणाऱ्या नागरिकांची कामे करण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो.

आशाताई पांडे दररोज औरंगाबाद ते भोकरदन असा प्रवास करून मतदारसंघात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात. तर औरंगाबाद येथे त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना जावे लागते.  विशेष म्हणजे त्या स्वतः गाडी चालवतात.

आमदार संतोष दानवेना त्यांची मोठी मदत होत असून त्या प्रत्येक कार्यकर्त्याला फोनवर तसेच प्रत्यक्ष सहज उपलब्ध होतात. आमदार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या सातत्याने पाठपुरावा करतात. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलाच अनुभव असून अनेकदा त्यांनी कर्मचाऱ्यांची याबाबतीत कानउघडणी देखील केली आहे.

सरपंच पदाच्या काळात दगडवाडी या त्यांच्या गावात  केलेली विकास कामेही नजरेत भरतात. पाहण्यासारखे हरिनाम सप्ताह, लग्नकार्य, वाढदिवस, अंत्यविधी ,उद्घाटन आदी विविध कामात त्यांची उपस्थिती  त्यांच्या जमेच्या बाजू समजल्या जातात.

वाढता जनसंपर्क व समाजकार्य बघता बहुतांश कार्यकर्त त्यांच्या आमदारकीचे स्वप्न बघतात.  मात्र आमदार संतोष दानवे यांच्या पाठीमागे नेहमी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी आमदारकीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपल्याला आमदारकीची कुठलीच आशा नाही असे सध्या तरीआशाताई  सांगतात.

 

 

 

संबंधित लेख