raosaheb danve support shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

भाजप-शिवसेनेत मोठी दरी नाही : रावसाहेब दानवे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

पुणे : भाजप आणि शिवसेनेमध्ये खूप मोठी दरी नाही. काही मतभेद आहेत मात्र आमच्या भूमिका एकमेकांना पूरक आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा समान आहे. त्यामुळे अयोध्येत शिवसेनेने जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागतच करतो. निवडणुकीच्या तोंडा समविचारी पक्ष जर एकत्र येत असतील तर आम्हीही एकत्र येऊ शकतो अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मांडली. 

अयोध्येच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना दानवे म्हणाले, की भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत. राम मंदिर हा कोण्या एका पक्षाचा मुद्दा नाही. जर कॉंग्रेस-राष्टवादीनेही या मुद्यावर पाठिंबा दिला तर त्याचे स्वागत आहे.

राम हा श्रद्धेचा भाग आहे. राम मंदिराचा मुद्दा हा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सरकारच्याही काही मर्यादा आहेत. एकतर हा प्रश्‍न कोर्टात किंवा तडजोडीने सोडविता येऊ शकतो. 2014 ची निवडणूक सोडली तर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही एकत्र लढलो आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकतो. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिवसेनेने यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

संबंधित लेख