Raosaheb Danve Says Patrol Hike is Due to Congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

रावसाहेब दानवेंचा दावा : म्हणतात 'काँग्रेसमुळेच होतेय पेट्रोल दरवाढ' 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

"इंधन दरवाढीला केंद्र सरकारला जबाबदार धरु नये. कारण हे काँग्रेस पक्षाचे अपत्य आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय दराशी ही वाढ निगडीत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. इंधनाचा 'जीएसटी' मध्ये समावेष व्हावा यासाठी लवकरच विविध राज्याच्या मुख्यमंत्र्याची लवकरच बैठक घेतली जाईल - रावसाहेब दानवे

नाशिक : पेट्रोल दरवाढीमुळे देशभरात भारतीय जनता पक्षावर टीका होते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या टिकाकारांनाच आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले, "अहो काँग्रेस पक्षच इंधन दरवाढीला जबाबदार आहे. 'राफेल' खरेदीत घोटाळ्यात सापडले तर काँग्रेसचेच लोक सापडतील. कारण हे सर्व निर्णय काँग्रेस पक्षाने घेतले आहेत.'' असा दावा त्यांनी केला. त्यामुळे उपस्थितांवर आवाक होण्याची वेळ आली. 

दानवे एका खासजी कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा झाली. ते म्हणाले, "इंधन दरवाढीला केंद्र सरकारला जबाबदार धरु नये. कारण हे काँग्रेस पक्षाचे अपत्य आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय दराशी ही वाढ निगडीत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. इंधनाचा 'जीएसटी' मध्ये समावेष व्हावा यासाठी लवकरच विविध राज्याच्या मुख्यमंत्र्याची लवकरच बैठक घेतली जाईल. यासंदर्भात काँग्रेस पक्ष संघर्ष यात्रा काढीत आहे. त्याचा काहीही उपयोग होत नाहीये. यापूर्वी 'चांदा ते बांदा' अशी संर्घष यात्रा काढली. ही यात्रा जिथे जीथे गेली तेथे राज्यभर भाजपला सत्ता मिळत गेली. त्यांनी आणखी यात्रा काढाव्यात. आमचा फायदाच होईल.'' 

ते म्हणाले, "गेल्या चार वर्षात भाजपच्या राज्यात एकही घोटाळा झालेला नाही. त्यामुळे विरोधकांना सरकारवर आरोप करण्याची एकही संधी मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसचा हल्ला बोल सुरु आहे. राफेल प्रकरणाचे देखील काँग्रस पक्षावर बुमरॅंग होईल. त्याच्या चौकशीत कोणी सापडलेच तर काँग्रेसवालेच सापडतील. कारण तो निर्णय काँग्रेसच्या काळात घेतला गेला आहे." बातम्यांत चर्चेत राहता यावे यासाठी राफेल प्रकरण उकरुन काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

संबंधित लेख