शुभेच्छांच्या निमित्ताने दानवेंकडून भाजप बंडखोराची मनधरणी? 

गेले वर्षभर सुरेश पाटील भाजपापासून अंतर राखून आहेत. यानिमित्ताने त्यांना पुन्हा भाजपमध्ये पायघड्या घातल्या जाण्याचे संकेत आहेत. आता स्थानिक भाजप नेत्यांत त्याची काय प्रतिक्रीया उमटते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शुभेच्छांच्या निमित्ताने दानवेंकडून भाजप बंडखोराची मनधरणी? 

नाशिक : महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी बंडखोरी केल्याने भाजपने पक्षातुन बडतर्फ केले आहे. आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाटील यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी दानवे यांनी सुरेश पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे दानवे यांनी पाटील यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. 

स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांचे चिरंजीव डॉ. अक्षय आणि माजी कृषी उपसंचालक के. एन. देशमुख यांची कन्या डॉ. ऐश्वर्या यांचा विवाह नुकताच झाला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दानवे नाशिकला आले होते. त्यांनी नवदांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पाटील कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, महापालिका गटनेते दिनकर पाटील, महेश हिरे यांसह विविध स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. गेले वर्षभर पाटील भाजपापासून अंतर राखून आहेत. यानिमित्ताने त्यांना पुन्हा भाजपमध्ये पायघड्या घातल्या जाण्याचे संकेत आहेत. आता स्थानिक भाजप नेत्यांत त्याची काय प्रतिक्रीया उमटते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com