Raosaheb Danve on Marataha reservation | Sarkarnama

अोबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण: दानवे 

भास्कर बालखंडे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जालना: " आेबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार लवकरच निर्णय  घेईल," असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

याबाबत दिलेल्या निवेदनात खासदार दानवे म्हणाले की," राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा अहवाल गुरूवारी (ता.15) राज्यसरकारला सादर केल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  घेतलेल्या पुढाकाराचा गाैरवपूर्ण उल्लेख करून  खासदार दानवे म्हणाले की,  " 2014च्या निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यात सरकारने मराठा  समाजाच्या आरक्षणाचा कायदा विधिमंडळात मंजूर केला होता.पंरतू त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही."

"मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात मंजुर व्हावे यासाठी भाजप सरकारने अनेक पुरावे गोळा करून अडीच  हजार पानाचे पानाचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.राज्यमागासवर्ग आयोगाचे गठन करून आयोगाकडून या विषयातील अहवाल सादर होईल यासाठी सरकारने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आयोगाचा अहवाल गुरूवारी (ता.15) सादर झाला आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला ," श्री.दानवे यांनी नमुद केले आहे.

संबंधित लेख