raosaheb danve | Sarkarnama

जयंत पाटलांना घेरण्यासाठी  रावसाहेब दानवे सरसावले 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 22 मे 2017

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महिलांविषयी काढलेल्या अनुद्‌गाराचे राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे या आमच्याच प्रॉडक्‍ट आहेत असे विधान केले होते. महिला सदस्यांच्या हरकतीनंतर त्यांनी हे विधान मागे घेत दिलगिरीही व्यक्त केली होती. पण, हा मुद्दा सभागृहाबाहेर पेटवून राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. 

विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम (जीएसटी) मंजूर करण्यातसाठी तीन दिवसीय विशेष आधिवेशन बोलवण्यात आले आहे. या आधिवेशनात पहिल्या दिवशी चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करीत भाजप सरकारला लक्ष्य केले होते. चिमटे काढत सत्ताधाऱ्यांना चांगलेच घायाळ केले होते. यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी या भाषणाचा संदर्भ देते भाजपच्या महिला आमदारांनी पाटील यांच्या भाषणाने महिलाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार विधानसभा अध्यक्षांनी रेकॉंर्डवरून हे वादग्रस्त विधान वगळले. विधानसभेत पाटील यानी महिला आमदारांच्या मागणीचा आदर करत दिलगिरी व्यक्त केली होती. हे प्रकरण मुळातच सभागृहातील आहे. 

प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र पाटील यांच्या वादग्रस्त विधानाची दखल राजकारण पेटविण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. दानवे यांनी नुकतेच शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्तविधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यांच्यावर चहूबाजूने टीकास्त्र सोडण्यात आले. शेवटी दानवेंना वादग्रस्त विधान मागे घेऊन माफी मागावी लागली होती. आता दानवे हे ही जयंत पाटीलांना घेरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.  
 
संबंधित लेख