raosaheb danave warns ajit pawar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अजितदादांच्या दारात पोलिस; कोणत्याही क्षणी अटक : दानवेंचा राष्ट्रवादीवर बाॅम्ब

ज्ञानेश्वर बिजले
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

पिंपरी : ""कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर सभेत केला. 

मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या अटल संकल्प महासंमेलनात दानवे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह या भागातील आमदार, पदाधिकारी निगडीत झालेल्या या सभेला उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, ""भाजपच्या सरकारवर भ्रष्टाचाराला एकही आरोप नाही. पण कॉंग्रेस सरकारच्या काळात टूजी घोटाळ्यापासून सिंचन घोटाळ्यापर्यंत अनेक घोटाळे झाले. आमच्या सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या, पण काहीही परीणाम झाला नाही. त्यांची यात्रा गेली, त्या भागात भाजप जिंकले. विरोधकांनी जातीय मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले.'' 

फडणवीस सिंचन घोटाळ्याविषयी म्हणाले, ""राज्यात 40 लाख हेक्‍टर क्षेत्रांवर आम्ही सिंचन क्षमता नेली. आधीच्या सरकारने सिंचन घोटाळा केला. त्यांच्या काळात निविदांपेक्षा 40 ते 50 टक्के जादा दरांनी कामे दिली. त्यांनी केलेल्या नऊ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या. आम्ही त्याच निविदा काढल्या, त्यापैकी 62 टक्के कमी दराने, 27 टक्के त्याच निविदा दराने, तर एक टक्का निविदा पाच टक्के जादा दराने आली. 30 ते 40 टक्के जादा दराने निविदा देऊन तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरायच्या.''

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुपारी पत्रकार परीषद झाली. त्यावेळी सिंचन घोटाळ्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी पवार म्हणाले, ""सिंचन घोटाळा प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. त्याबद्दल आमची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी आवश्‍यक सहकार्य आम्ही देत आहोत.'' 

संबंधित लेख