लोकसभा उमेदवाराच्या शोधात रावसाहेब दानवे बारामतीत

खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ म्हणून बारामतीला देश पातळीवर विशेष महत्व आहे.
लोकसभा उमेदवाराच्या शोधात रावसाहेब दानवे बारामतीत

बारामती :  लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी राज्यात सुरु झाली असून बारामती लोकसभा मतदारसंघावरही भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बुधवारी (ता. 16) बारामतीत येत असून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीबाबतचा सविस्तर आढावा ते घेणार आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ म्हणून बारामतीला देश पातळीवर विशेष महत्व आहे. गेल्या निवडणूकीत महादेव जानकर यांनी सुळे यांना लढत देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता, त्या पार्श्वभूमीवर यंदाचे चित्र नेमके काय असेल या बाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार यात शंका नाही, या मतदारसंघात सुळे यांनी लढत देण्यासाठी तितक्या ताकदीचा उमेदवार देणे गरजेचे असल्याने दानवे या बाबत बारामतीतील बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे निवडणूक लढविणार असल्याचे त्यांच्याच पक्षातील प्रमुखांकडून जाहिर केले असल्याने भाजपची या बाबत नेमकी भूमिका काय असेल, या बाबतही उत्सुकता आहे.

सुळे यांना टक्कर देणा-या महादेव जानकरांना भाजपने जवळ करीत मंत्रीपद बहाल केले आहे, राज्य पातळीवर रमलेले जानकर लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा लढविणार की राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार या बाबतही कमालीची उत्सुकता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष असते त्यामुळे ही निवडणूक नेहमीच लक्षवेधी असते, आता भाजप स्वपक्षीय उमेदवाराची निवड करणार की महादेव जानकरांना पाठिंबा देणार या बाबतही काय निर्णय घेणार या बाबत उत्सुकता आहे. सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघावरील प्रभाव विचारात घेता तितक्या ताकदीचा उमेदवार देण्याचे आव्हान भाजपपुढे असेल. युतीचे चित्र अद्यापही स्पष्ट नसल्याने शिवसेनेची भूमिका या बाबत गुलदस्त्यातच आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com