raosaheb danave and bjp | Sarkarnama

परभणीसाठी भाजपकडे चांगले चेहरे - रावसाहेब दानवे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराची चाचपणी आम्ही पूर्ण केली आहे. चांगले चेहरे समोर आहेत असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी आम्ही स्वबळावर सुध्दा तयार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाची लोकसभा मतदार संघात झालेली कामे व संघटन याची माहिती घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे सोमवारी (26) परभणी येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी खासदार श्री. दानवे बोलत होते. 

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराची चाचपणी आम्ही पूर्ण केली आहे. चांगले चेहरे समोर आहेत असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी आम्ही स्वबळावर सुध्दा तयार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाची लोकसभा मतदार संघात झालेली कामे व संघटन याची माहिती घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे सोमवारी (26) परभणी येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी खासदार श्री. दानवे बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी राज्यातील लोकसभा मतदार संघांचा दौरा करत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा या विभागातील लोकसभा मतदार संघाचे दौरे पुर्ण करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बुथ समित्यांचे गठन केले आहे. सांगितलेली 23 कामे पूर्ण झाली आहेत की नाही याची माहिती मी घेत आहे. निवडणुकीसाठी बुथ प्रमुखासह इतरांना तयार केले जात आहे. राज्यातील बहुतांश महापालिका भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. आता धुळे आणि नगर या दोन महापालिकांही आम्ही जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. चांगले चेहरे पक्षाकडे आहेत. आमची चाचपणी झाली आहे. त्यातून निश्‍चितच चांगला उमेदवार लोकसभेला देणार आहोत असे म्हणत त्यांनी आमची स्वबळावरची तयारी पूर्ण झाली असल्याचे संकेत दिले आहेत. त्याच बरोबर युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. परंतू जागा वाटपाच्या बैठकीत हा निर्णय होईल. आमचे काम चांगले आहे. तरीही समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे. आमचे शिवसेनेशी मतभेद असतील परंतू सरकारमध्ये वाद नाहीत असे ही सांगण्यास श्री. दानवे विसरले नाहीत. 
उमेदवार जिल्ह्याचा नाही तर मतदार संघातीलच 
लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील उमेदवार नाही तर परभणी लोकसभा मतदार संघातीलच असेल असे म्हणत उमेदवार हा परभणी किंवा जालन्याचा असू शकतो असे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, आमदार मोहन फड आदींची उपस्थिती होती. 

दानवेंमुळे दोन पदाधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर सफर 
हेलीकॉप्टरमध्ये बसून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना फेऱ्या मारण्याचे किस्से महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले आहेत. असाच किस्सा सोमवारी परभणीत 
ही घडला. पक्षकार्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या दोन पदाधिकाऱ्यांना हेलीकॉप्टरमधून औरंगाबादला जाण्याची संधी दिली. 
त्याचे झाले असे की, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे सोमवारी परभणी येथे आले होते. दानवे यांचे सायंकाळी पाच वाजता परभणीत आगमन 
झाले. त्यानंतर ते मुक्कामी थांबणार होते. हेलीकॉप्टर परत औरंगाबाद येथे जाणार होते. आता रिकामेच हेलीकॉप्टर औरंगाबाद येथे जाणार म्हणल्यावर भाजपच्या दोन जुन्या पदाधिकाऱ्यांना दानवे यांनी हेलीकॉप्टरमधून उतरताच जायचे का औरंगाबादला....! हेलीकॉप्टर रिकामेच चालले आहे...असे विचारले. तेव्हा या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी तात्काळ होकार देत थेट हेलीकॉप्टरमध्ये शिरकाव केला. दानवे यांच्या मुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांना परभणी ते औरंगाबाद ही हेलीकॉप्टरची सफर करण्यास मिळाली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी हेलीकॉप्टरची सफरेचा व्हिडिओ देखील करून आपल्या मित्रांना लागलीच पाठविला. या हेलीकॉप्टर सफरची शहरभर सोमवारी चर्चा होत होती. 

संबंधित लेख