रावसाहेब दानवेंनी युती धर्म न पाळता 'जावईधर्म' पाळला : खैरे

हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
khaire-danve-Jadhav.
khaire-danve-Jadhav.

औरंगाबाद: " भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळला नाही तर जावईधर्म पाळला,'' अशी टीका शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, "औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे होते. रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म पाळण्याऐवजी आपल्या जवळच्या भाजप कार्यकर्त्यांना हर्षवर्धन जाधव यांचे काम करण्याचे सांगितले. रावसाहेब दानवे यांच्या युतीविरोधी कारवायांची तक्रार मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली आहे.'' 

हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. ते कन्नडचे शिवसेना आमदार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. चंद्रकांत खैरे आणि त्यांचे संबंध संघर्षाचेच राहिले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com