ranjitsinh mohite patils man khatav tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

म्हणून रणजितसिंह मोहीते पाटलांनी माण तालुक्यात गाठीभेठी वाढविल्या!

आण्णा काळे 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

रणजितसिंह यांनी आपल्या जुन्या कार्यकत्यांच्या घरी चहापान ही घेतले.

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडुक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडुन अनेकांनी दंड थोपाटले आहेत. माजी आमदार दिपक साळुंखे यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. तर माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी करमाळा, पंढरपुर भागात दौरे वाढवले आहेत. त्याची प्रतिक्रिया म्हणून खासदार विजयसिंह मोहीते -पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी माण-खटाव तालुक्यात गाठीभेठी वाढविल्या आहेत.

मूळ माण तालुक्याचे असलेल्या प्रभाकर देशमुख यांनी करमाळ्याच्या माजी आमदार शामलताई बागल यांची भेट घेऊन नुकतीच चर्चा केली. त्यानंतर रणजितसिंह यांनी माण-खटाव तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनासाठी ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील उपस्थित होते. या स्नेह भाजनाला असलेल्या उपस्थितांनी हवा तो राजकिय अर्थ काढला आहे.

याच्याच एक दिवस अगोदर वाॅटरकप विजेत्या टाकेवाडी, ता. माण येथे गावाच्या कृतज्ञता व गौरव सोहळ्यास रणजितसिंहाची आवर्जुन उपस्थिती होती. त्या कार्यक्रमालाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उयस्थिती होती.त्या वेळी रणजितसिंह यांनी आपल्या जुन्या कार्यकत्यांच्या घरी चहापान ही घेतले होते. इच्छुक कितीका असेना आपला जनसंपर्क आणि जनतेशी असणारी नाळ तुटु द्यायची नाही, उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल आपण फक्त आपले काम सुरू ठेवायचे या भावनेतुन रणजितसिंह मोहीते पाटील यांनी माण दौरा करत तरूणांशी संवाद साधला असल्याचे सांगितले जात आहे. 

संबंधित लेख