नारायण राणेंचा शिवसेनेवर राग मात्र लवकरच त्यांचेही मतपरिवर्तन होईल : गिरीश महाजन

"शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होने ही काळाची गरज होती. त्यानुसार ती युती झाली आहे. त्यामुळे देशाचे व राज्याचे राजकीय वातावरण बदलेल. या युतीमुळे काही लोक नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा शिवसेनेवर राग आहे, पण देशाला मजबूत सरकार हवंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंसोबत चर्चा करतील, त्यातून राणेंचं मतपरिवर्तन होईल,'' असा दावा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केला.
नारायण राणेंचा शिवसेनेवर राग मात्र लवकरच त्यांचेही मतपरिवर्तन होईल : गिरीश महाजन

नाशिक : "शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होने ही काळाची गरज होती. त्यानुसार ती युती झाली आहे. त्यामुळे देशाचे व राज्याचे राजकीय वातावरण बदलेल. या युतीमुळे काही लोक नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा शिवसेनेवर राग आहे, पण देशाला मजबूत सरकार हवंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंसोबत चर्चा करतील, त्यातून राणेंचं मतपरिवर्तन होईल,'' असा दावा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केला.

महाजन आज शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, ''युती करण्याचा निर्णय चांगला आहे. दोन्ही पक्षांची युती स्वाभाविक आहे. यामध्ये लोकसभेसाठी जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार आता मतदारसंघांत बदल करण्याची मागणी केली, तरी त्यात बदल होणार नाही. भाजपला देशात सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातूनच मिळतील. राज्यातील युतीला लोकसभेच्या नव्वद टक्के जागा मिळतील."

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी ते म्हणाले, "खडसेंचे म्हणणे बरोबर आहे. यावेळी मुख्यमंत्री युतीचाच होईल. मागील निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो होतो. निवडणुकीनंतर एकत्र आलो. यावेळी एकत्र लढू त्यामुळे मुख्यमंत्री युतीचाच असेल. युती झाल्याने काही लोक नाराज होऊ शकतात. मात्र, ती काळाची गरज होती. देशाला मजबूत सरकार हवंय."

ते पुढे म्हणाले, "भाजप-सेना युती झाल्यानं कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. म्हणून त्यांचे आरोप सुरु आहेत. त्यात काहीच गांभीर्य नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप त्यातुनच आहेत. भाजप सरकार कधीच सुडबुध्दीने काम करीत नाही, आमचं ते काम नाही. सुडबुद्धीने वागलो असतो, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खुप गोष्टी बाहेर काढल्या असत्या."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com