rane warn the bjp leader | Sarkarnama

शिवसेनेबरोबर युती केल्यास भाजपबरोबर जाणार नाही - नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

सिंधुदुर्ग : पाच राज्यातील निवडणुकांमध्ये जो पराभव झाला त्यातून भाजपने धडा घ्यावा, विविध प्रश्‍नांवर ठाम भूमिका घ्यावी व जनतेला दिलेली आश्‍वासने पाळावीत असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर उत्तरे देताना त्यांनी भाजपच्या धोरणावर व विविध निर्णयावर जोरदार टीका केली. भाजपच्या सिंधुदुर्गमधील स्थानिक नेत्यानी काही दिवसापूर्वी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती त्यालाही त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

भारतीय जनता पक्षाने जनतेला दिलेली आश्‍वासने पाळली तर आगामी लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागू शकतो मात्र जर त्या पक्षाने काही बदल केले नाहीत तर पाच राज्यातील निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते अशेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुढील लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार आहे असेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे "तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' या म्हणीप्रमाणे वागणे असून त्यांची युती नक्की होणार आता ते भांडून घेत आहेत मात्र त्यांची युती झाली तर आपण भाजपबरोबर जाणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मध्यंतरी शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली, पण त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. अगदी 10 मिनिटांची ती भेट होती, पत्रकारांनी त्या भेटीबद्दल चुकीच्या बातम्या दिल्या असाही आरोप त्यांनी केला. 

संबंधित लेख