rane theatens me : Parkar | Sarkarnama

मला मारण्यासाठी राणेंची सुपारी : संदेश पारकर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कणकवली : हे शहर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रबिंदू म्हटले जाते. मात्र या शहरात राडेबाजीचे प्रमाण वाढले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपचे नेते संदेश पारकर यांच्यातील वैर आता वेगळ्या पातळीवर पोचले असून मला मारण्यासाठी राणे यांनी सुपारी दिल्याचा आरोप पारकर यांनी केला आहे. 

कणकवली : हे शहर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रबिंदू म्हटले जाते. मात्र या शहरात राडेबाजीचे प्रमाण वाढले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपचे नेते संदेश पारकर यांच्यातील वैर आता वेगळ्या पातळीवर पोचले असून मला मारण्यासाठी राणे यांनी सुपारी दिल्याचा आरोप पारकर यांनी केला आहे. 

या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ, खून यासारखे मोठे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे कणकवलीची राडे संस्कृती फार काही नवीन नाही. त्याची पुनरावृत्ती दोन दिवसांपूर्वी झाली. राणे आणि पारकर गटामध्ये बाजारपेठेत हाणामारी झाली.  म्हणूनच राजकारण्यांचे कणकवली शहर हे" राजकीय राडे "शहर म्हणून  म्हणून ओळख पूर्वीपासून निर्माण झाली आहे

भाजपचे नेते संदेश पारकर आणि नारायण राणे यांच वैर राजकारणात आणि प्रत्यक्षात देखील सुद्धा आहे. त्यामुळे दोघेजण एकमेकांकडे कठोर भूमिकेने वारंवार पाहत असतात. याबाबत बोलताना पारकर यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी कणकवली शहरातील शिवाजी महाराजांचा स्थलांतरचा मुद्दा असेल, नऊशे कोटींचा कचरा प्रकल्प असेल आणि नारायण राणे यांची जिल्ह्यातील विश्वास यात्रा असेल याबाबत मी अनेकदा मुद्द उपस्थित केले होते. त्यामुळे राणे बिथरले होते. त्यांनी आक्रमक होऊन मला मारण्यासाठी कणकवली शहरातील गुंड सोडले.

पारकर यांच्या या आरोपाला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पृष्टी दिली. विकासाच्या मुद्यावर कणकवलीवासियांनी नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांना निवडून दिले. तेच नगराध्यक्ष गुंडगिरी करून गाड्यांची तोडफोड करताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा गुंडांचा असल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते अशी गुंडगिरी करत असेल तर शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

पारकर आणि नाईक यांच्या आरोपांवर राणे यांच्याकडून काय प्रत्युत्तर मिळणार, याची प्रतिक्षा आहे. 

संबंधित लेख