Rane - Tatkare come to resque Vinod Tawde | Sarkarnama

विनोद तावडे यांच्या मदतीला राणे -तटकरे धावले 

  सरकारनामा  ब्युरो                    
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

 मुंबई  : मुंबई विद्यापीठाच्या गैरकारभारविरुद्ध तसेच परीक्षा निकाल उशिरा लागत आहे. याला जबाबदार शिक्षण मंत्री  विनोद तावडे असून त्यांच्याविरोधात विशेष अधिकार हक्कभंग प्रस्ताव शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला.

 मुंबई  : मुंबई विद्यापीठाच्या गैरकारभारविरुद्ध तसेच परीक्षा निकाल उशिरा लागत आहे. याला जबाबदार शिक्षण मंत्री  विनोद तावडे असून त्यांच्याविरोधात विशेष अधिकार हक्कभंग प्रस्ताव शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला.

मात्र परब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने ते हक्कभंग मांडू शकतात का ? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला तर सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव नियमात बसतो  का ? अशी हरकत घेतल्याने विधान परिषदेत तावडे यांच्या मदतीला राणे - तटकरे धावल्याचे दिसून  आले 

" मुंबई विद्यापीठाचा  30  एप्रिलला शेवटचा पेपर झाला. 45 दिवसात निकाल लागणे अपेक्षित होते.  ऑनलाइन असेमेन्ट करायची होती तर त्याची सूचना आधी द्यायला हवी  होती. ज्यांची निकाल लावण्याची जबाबदारी आहे त्या पदाच्या बाबतीत सरकारने गंभीर नाही.

रजिस्ट्रार, प्रो - व्हाईस चान्सलर पदे रिक्त आहेत, त्यामुळे आम्ही कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यानी राजिनाम्याची मागणी केली तेव्हा आमचा अभ्यास कच्चा  आहे  अशी  आमची थट्टा करण्यात आली", असे  अनिल परब यानी सभागृहात सांगितले. 

यावेळी नारायण राणे यांनी हरकत घेत सांगितले की , " भाजपा आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत तर शिवसेना सदस्य हक्कभंग प्रस्ताव देऊ  शकतात  का?"

तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले  की, "  सरकारमध्ये राहायचं आणि हक्कभंग मांडायचा  ही कसली शिवसेनेची  भूमिका आहे ? "

यावर नारायण राणे यांनी अनिल परब यांना असा टोला लगावला  की, "सत्तेतून बाहेर पडा . राजीनामे द्या मग हक्कभंग मांडा . "

उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी परब यांचा प्रस्ताव स्वीकारत तावडे यांनी खुलासा करावा असे निर्देश दिले आहेत.

संबंधित लेख