भाजपच्या अंगणात राणे पिता-पुत्रांची २७ अगोदरच एन्ट्री नक्की..?

भाजपच्या अंगणात राणे पिता-पुत्रांची २७ अगोदरच एन्ट्री नक्की..?

मुंबई : राणे पिता-पुत्रांची भाजपमधील एन्ट्री नक्की झाली असून येणाऱ्या काही दिवसांतच त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा अचानकपणे होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २७ ऑगस्टला मुंबई दौऱ्यावर असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात त्यांच्या हस्ते 'हमारे नरेंद्र भाई' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याला राणे कुटुंबियांची प्रमुख उपस्थिती असणार असून शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांचा सत्कार सोहळा पार पडेल. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या उत आला असून फक्त प्रवेशाची घोषणा तेवढी बाकी राहिली आहे. राणेंच्या भाजप पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपला चांगलाच जम बसविता येईल, अशी आशा भाजपला वाटते. काही महिन्यांपूर्वी नारायण राणे मुख्यमंत्र्यांसह अमित शहा यांच्या भेटीला अहमदाबाद येथे गेले होते. त्यावेळी तब्बल अडीच तास त्यांच्यात चर्चा झाली. भेटी दरम्यानच राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत खुद्द नरेंद्र मोदी आग्रही आहेत, अशी चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

आशिष शेलार यांचा दिल्ली दौरा राणें साठीच...
भाजपमध्ये मंत्रिमंडळ बदलांचे वारे वेगाने वाहू लागल्याने भाजपच्या अनेक नेत्यांना दिल्लीला बोलावणे आले. परंतु, भाजपच्या पक्षाच्या कामानिमित्त मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांना दिल्लीत बोलावले होते. त्यासोबतच राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. आशिष शेलार यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेला देखील मुंबई महापालिका निवडणुकांच्या अगोदर उधाण आले होते. परंतु, सध्या मला मंत्रिपद नको तर संघटनेत राहून काम करायचे आहे. द्यायचेच असेल तर कोकणातील जबाबदारी द्या, असेही शेलार यांनी बोलून दाखवले. परंतु, ती शक्यताही आता दूर सारून त्यांना कर्नाटकाची जबाबदारी दिली असल्याचे सूत्रांकडून समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com