राणे म्हणाले, मराठा मोर्चाचा फायदा घेऊ नका! 

मराठा क्रांती मूक मोर्चाचे मुंबईत येत्या शनिवारी 9 आँगस्ट क्रांतीदिनी करण्यात आले आहे. यासाठी आज सर्व पक्षीय आमदारांनी निर्धाराची वज्रमुठ आवळली. कॉंग्रेस आमदार नारायण राणे यांनी या मोर्चाचा फायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करु नये, असे आवाहन केले.
राणे म्हणाले, मराठा मोर्चाचा फायदा घेऊ नका!
राणे म्हणाले, मराठा मोर्चाचा फायदा घेऊ नका!

मुंबई: मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन मुंबईत येत्या शनिवारी 9 आँगस्ट क्रांतीदिनी करण्यात आले आहे. यासाठी आज सर्व पक्षीय आमदारांनी निर्धाराची वज्रमुठ आवळली. कॉंग्रेस आमदार नारायण राणे यांनी या मोर्चाचा फायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करु नये, असे आवाहन केले. 

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार आशिष शेलार, आमदार विनायक मेटे, आमदार सतेज पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. 

मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मराठा समाज आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मोर्चाच्या आयोजकांनी सरकारसमोर मागण्या व्यवस्थित मांडाव्यात, सर्वपक्षीय आमदार आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची समन्वय समिती स्थापन करावी, समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना मोर्चाआधी चर्चा करावी, मराठा आरक्षणाची स्थिती काय आहे, आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई कशी लढली जात आहे याबाबत माहिती मुख्यमंत्र्यांना विचायला हवे, असा सूर आमदारांनी आळवला. 

मराठा मोर्चाच्या आयोजकांच्या पाठीमागे ठाम राहत मराठा आमदारांनी मोर्चात एक सर्व सामान्य मराठा म्हणून सहभागी होण्याचे या बैठकित ठरवण्यात आले. मराठा आमदारांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले, मराठा समाजातील आमदारांनी समाज म्हणून एकत्र यायला हवे. मराठा समाजाच्या प्रश्नांची चर्चा करून टप्पे ठरवायला हवेत. कोणीही या मोर्चाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. पक्षासाठी आपण हवे ते करू पण आता समाजासाठी हवं ते करायला हवे अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com