randhir sawarkar akola east | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आजचा वाढदिवस : रणधीर सावरकर आमदार (अकोला)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 एप्रिल 2018

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्ष पदापासून आपल्या राजकीय जीवनाला त्यांनी सुरवात केली. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्यांचे राजकीय गुरू व मामा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांच्या तालमीत त्यांनी राजकीय धडे गिरविले.

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्ष पदापासून आपल्या राजकीय जीवनाला त्यांनी सुरवात केली. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्यांचे राजकीय गुरू व मामा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांच्या तालमीत त्यांनी राजकीय धडे गिरविले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंच्या अकोला पूर्व मतदारसंघाच्या गडाला खिंडार पाडत पहिल्या निवडणुकीतच आमदार सावरकर यांनी विजयी पताका फडकविली. विदर्भ, मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील खारपाणपट्याचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने स्वर्गीय नानाजी देशमुख स्वावलंबन योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेच्या महत्त्वपूर्ण समितीवर संपूर्ण राज्यातून एकमेव आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली. त्यानंतर विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या सदस्यपदीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांची वर्णी लावली आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात आमदार सावरकर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 

संबंधित लेख