randhir sawarkar akola | Sarkarnama

आमदार रणधीर सावरकरांनी केली चिखल तुडवत नुकसानाची पाहणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

जिल्ह्याच्या राजकीय पलटावर आमदार रणधीर सावरकर हे अभ्यासु व जनतेच्या सुख-दुखाःत धावून जाणारे नेतृत्व म्हणुन परिचीत आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकट काळात त्यांना धीर देण्यासाठी सुरू केलेली ही पाहणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना अशा कठीण प्रसंगाला सामनोरे जाण्याचे आत्मबळ मिळत असल्याने आमदार सावरकर यांचा हा पाहणी दौरा शेतकऱ्यांना दिलासा देणाराच ठरत आहे. 
 
अकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोठ्या तत्परतेने पाहणी करून शेतकऱ्यांना धिर देण्याचे काम भाजपचे आमदार रणधीर सावरकर करीत आहेत. भर पावसात चिखल तुडवत आमदार सावरकर अधिकाऱ्यांसह थेट बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असल्याने त्यांचा ही मोहिम शेतकऱ्यांना दिलासा देणारीच ठरत आहे. 
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतामधील गहु, हरभरा, कांदा, मका, संत्री, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काबाडकष्ट करून पिकविलेले पिक गारपिटीमुळे उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अकोला व अकोट तालुक्‍यातील अनेक गावातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा दुखाःचा डोंगर कोसळला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती मिळाल्यानंतर गत दोन दिवसांपासून आमदार रणधीर सावरकर यांनी या मोठ्या तत्परतेने या परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी मोहिम हाती घेतली आहे. 
महसुल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत आमदार सावरकर दिवसभर चिखल तुडवत गारपिटीमुळे नुकसान झालेल्या देवरी फाटा, आलेवाडी, पाटसुल, रौंदळा, पाटसुल रेल्वे आदी गावातील शेतांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार सावरकर यांनी शेतकऱ्यांना दिली. 

संबंधित लेख