randhir sawarkar | Sarkarnama

अकोल्यातील भाजप नेत्यांविरोधातल्या गुन्ह्याने राजकीय वर्तुळात खळबळ, शह-काटशहाचे राजकारण?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मे 2017

अकोला : मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाचे साडेसहा कोटी रुपयांचे बिल थकविल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी भाजपचे अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. व्यावसायिक संबंधांतून चार वर्ष जुन्या असलेल्या या प्रकरणाला हवा देण्यामागे कोणत्या राजकीय नेत्यांचा डाव आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईची किनार तर नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे. 

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपत अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शह-काटशहाचे राजकारण वाढले आहे. पक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई येवढी टोकाला गेली की एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवण्यासाठी सुरू असलेला हा सत्तासंघर्ष आता विकोपाला गेला आहे. त्यातून तर हा प्रकार घडला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

मुंबईतील कन्नमवारनगर येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचे साडेसहा कोटीची रक्कम थकविल्याच्या बांधकाम व्यावसायिक सचिन काळे यांच्या तक्रारीवरून शनिवार (ता.27) विक्रोळी पोलिसांनी आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, ऋषीकेश पोहरे आणि बळवंत महल्ले यांच्याविरुद्ध फसवणूकीसह विविध गुन्हे दाखल केले. सचिन काळे आणि आमदार सावरकर यांच्यासह पाचही जणांमधील व्यावसायिक संबंधातील वादाचे हे प्रकरण चार-पाच वर्षांपूर्वीचे असून न्यायप्रविष्ट आहे.

मात्र, या प्रकरणात आमदार सावरकरांसह पाचही जण धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे नोंदणीकृत भागीदार नसून त्यांनी या नावाने बॅंक खाते काढून आपली फसवणूक केल्याची तक्रार सचिन काळे यांनी पुन्हा नव्याने दाखल केली. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सावरकरांनी संबंधित ठेकेदाराला पिस्तुलाने धमकावले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या आरोपांना न्यायालयातच प्रत्युत्तर देण्याचे सावरकर यांनी जाहीर केले आहे. मात्र भाजपमधील बडे नेते यात अडकल्याने अकोल्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

संबंधित लेख