ramraje nimbalkars post in danger | Sarkarnama

रामराजेंचे विधान परिषद सभापतीपद धोक्‍यात  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

सातारा : विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढल्याने भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. तर यापूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेला राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या विधान परिषदेचे सभापती पद राष्ट्रवादीकडे तर उपसभापती पद कॉंग्रेसकडे आहे. पण बदललेल्या संख्याबळानुसार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सभापती पद धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

नुकतीच विधान परिषदेची नवडणुक बिनविरोध झाली. या बिनविरोध निवडीने भाजपचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढून 22 झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्वाधिक आमदार असणारा भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेचे 12 आमदार आहेत. आतापर्यंत संख्याबळाच्या जीवावर राष्ट्रवादीने सभापती पद पदरात पाडून घेतले होते. पण आता त्यांचे संख्याबळ 22 वरून 17 झाले आहे. तर कॉंग्रेसचे संख्याबळ 19 वरून 17 वर आले आहे. तसेच रिपब्लिकन, लोकभारती , शेतकरी कामगार पक्ष, अपक्ष असे एकुण चार आमदार बरोबर असल्याने आघाडीचे संख्याबळ 38 होत आहे. 

त्यामुळे संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे असलेले सभापती व कॉंग्रेसकडे असलेले उपसभापती पद धोक्‍यात आले आहे. भाजपकडे यापूर्वी 17 सदस्य होते. आता त्यांचे संख्याबळ 22 झाले आहे. तर शिवसेनेचे संख्याबळ नऊ वरून 12 वर गेले आहे. भाजपसोबत रासप एक, अपक्ष दोन आणि रिक्त जागा एक असे 25 ससद्‌य आहेत. तर शिवसेनेकडे 12 व तीन अपक्ष असे 15 आमदार आहेत. त्यामुळे युतीचे एकुण संख्याबळ 40 झाले आहे तर आघाडीकडे 38 संख्याबळ आहे. 

सभापती पदावर सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर हे आहेत. त्यामुळे सातारकरांत त्यांचे सभापती पद राहणार की जाणार याची उत्सुकता आहे. 

संबंधित लेख