रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठा शिकवू नये : रामराजे नाईक निंबाळकर

रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठा शिकवू नये : रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : सकाळपासून रात्रीपर्यंत जे लिटरवर असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, तुमची श्रध्दा कोणावर आहे ते सर्वांना माहिती आहे. आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हातपाय बांधलेत असे समजू नका, केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांमुळे गप्प बसतो, असे प्रत्युत्तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजेंच्या टिकेला दिले. 

आळजापूर (ता. फलटण) येथील एका खासगी कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले, फलटण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शिवारात पाणी खळाळण्यासाठी मला नीरा देवधरचे काम पूर्ण करायचे आहे. यासाठी मला आमदार किंवा खासदार होण्याची गरज नाही. मी अपक्ष असतानाही जनतेच्या हिताची कामे केली आहेत. ज्यांना कोणाला साताऱ्यात खासदार व्हायचे आहे त्यांनी होऊ द्यात. आमच्या पाठीशी आमचे नेते खासदार शरद पवार असल्याने आम्ही केवळ विकासाची भाषा बोलतो. असभ्य कधीच बोलत नाही. केवळ खासदार शरद पवारांमुळे आम्ही गप्प बसतो. आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हातपाय बांधलेत असे समजू नका. सकाळपासून रात्रीपर्यंत जे लिटरवर असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. तुमची श्रध्दा कोणावर आहे ते सर्वांना माहिती आहे, असा टोला सभापती रामराजे यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com