ज्येष्ठ, अभ्यासू असलेल्या रामराजेंची लोकसभा लढविण्याची इच्छा; संजीवराजेंसाठीही तयारी

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा अनेक प्रश्नांवर अभ्यास आहे. पाणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. कायद्याचे अभ्यासक असलेल्या रामराजेंनी राजकारणात भल्याभल्यांना चितपट केले. फलटणचे नगरसेवक ते विधान परिषदेचे सभापती असा त्यांचा प्रवास हा एका उमद्या नेत्याचा राजकीय प्रवास आहे. त्यांनी आपली राजकीय मते सरकारनामा फेसबुक लाइव्हवर बेधकड मांडली आणि आगामी राजकारणाचे सूतोवाचही केले.
ज्येष्ठ, अभ्यासू असलेल्या रामराजेंची लोकसभा लढविण्याची इच्छा; संजीवराजेंसाठीही तयारी

सातारा : मी वयाने ज्येष्ठ असल्याने लोकसभेत रमू शकेन. शिक्षक असल्याने अभ्यासाची आजही सवय आहे. दिल्लीत वातावरण आंतराष्ट्रीय आहे. त्यामुळ तिथे काम करायला आवडेल पण त्याचा त्याबाबचा निर्णय पक्षीय पातळीवर आहे. संधी दिली तरी लोकसभा निवडणूक लढवेन, अशी भूमिका विधान परिषदेचे सभापती रामराजेन नाईक निंबाळकर यांनी `सरकानामा` फेसबुक लाइव्हवर मांडली.

माझ्या भूमिकेला दुय्यम स्थान आहे. पण पक्षाने निर्णय घेतल्यास माझी तयारी आहे. तसेच संजीवराजेंना संधी दिली तरी चालेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. शरद पवार साहेब घेतील तो अंतिम निर्णय असेल, हे मात्र त्यांनी निक्षूनपणे सांगितले. 

फलटणसाठी राजकराणात आलो

फलटणचे नगराध्यक्ष ते विधान परिषदेच्या सभापतीपर्यंतचा प्रवास त्यांनी या मुलाखतीत मांडला. नगराध्यक्ष, नगरसेवक पदापासून ते राज्यातील विधान परिषदेचा सभापती या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास हा अपघात एक आहे. कुटुंबाला स्वातंत्र्यानंतर राजकीय वलय होते. करीयर म्हणून कधी राजकारणाकडे पाहिले नव्हते. पुण्यात विधी महाविद्यालयात शिकवत होतो. फलटणकडे दुर्लक्ष झाले होते. चुलत्यांच्या रूपाने राजकारणात पिढी होती. तत्कालीन राजकीय खेळखंडोबामुळे फलटण विकासासाठी लक्ष घालणे गरजेचे होते, त्यासाठी राजकारणात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शिरवळला टाऊनशिप का झाली नाही?

राजकीय क्षेत्रात अजिबात करीयर करायचे नव्हते. आंतरराराष्‍ट्रीय कायद्याच्या अभ्यासात करीयर करायची इच्छा होती. फलटण व सातारा जनतेच्या विश्‍वासामुळे 25 वर्षात काम झाले. नगरपालिका कशी स्थिर करावी यासाठी अभ्यास झाला. तालुक्याच्या शहरातील पालिकांचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेवून त्या मजबूत कराव्या लागणार आहेत. वाढती शहरीकरणे मोठ्या शहरांना लागू आहेत असे नाही. सरकारची पालिकांना मदत लागणार आहे. सरकार देते, मात्र पालिकांना आर्थिक स्त्रोत फार कमी आहे. स्मार्ट सिटीची आपण भाषा करतो. ती करण्यापेक्षा ज्या स्मार्ट सिटीमुळे पायाभूत सुविधांवर येणारा ताण लक्षात घेवून स्मार्ट सॅटेलाईट सिटी केल्यास योग्य होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुण्यापासून 70 किलोमीटरवर शिरवळला टाऊनशिप केली असती तर पुणे व शिरवळ, फलटण व शिरवळ विकासासाठी योग्य झाले असते, असाही उपाय त्यांनी सुचवला.

सभागृहात समलोत राखण्यात यश

विधान परिषदेला मोठी परंपरा आहे. त्यामध्ये राजकीय भावना आणून देत नाही. निवडून देताना विचित्र अवस्थेत निवड झाली आहे. सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत समतोल राखण्यात यश मिळाले. घटनेतील व आसत्ताचे सक्युल्यारिझम यात दोन वेगळे अर्थ काढले केले आहेत. जात बघून जगायचे नाही, देश म्हणून पुढे जायच हे जेव्हा समजते तेव्हा ही पासिंग फेज आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना सावधगिरीची पाऊले टाकावी लागणार आहे. सत्तेच्या नादाने कुठपर्यंत न्यायचे हे ठरवले पाहिजे. सत्तेच्या राजकारणासाठी जातीभेद करायचे. राजकारण व पक्षाच्या नेतृत्वावर हे येणार आहे. तितकेच समाजात बाहेर राहून प्रभाव टाकणारे नेतृत्व राहिली नाहीत हे दुर्देव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपल्याकडे पाणी मर्यादित आहे. त्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पाणी वापर 50 टक्के शहरीकरण त्यामुळे पिण्याला प्राधान्य द्यावे लागते. ऊसातून पैसे मिळतात शेतकऱ्याचा समज आहे. पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्यमुळे लागणारे अन्न व निवारा या कचट्यातील हा प्रश्‍न आहे. जास्त पाण्याच्या पिकांबाबत शेतकऱ्याचा समज दूर करावा लागणार आहे. त्यासाठी ठिंबक सिंचन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 
   

उसावर नियंत्रणाची गरज

जलसंधारणाचे काम राज्यात पश्‍चिम महाराष्‍ट्र आघाडीवर आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना खूप निधी दिला गेला. या शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तसेच पाणी फाऊंडेशनचे काम मोठे आहे. कोकणात आजही पाऊस कमी असला तरी दुष्‍काळ जाणवत नाही. पहिली धरणे होणे आवश्‍यक आहे. वेळ गेला तरी कामे भरपूर झाली आहेत. ओढ, नाल्यांनी जलसंधारणाची काम झाली आहेत. त्यामुळे फलटण, खंडाळा येथे भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यासाठी जलसंधारण व पाणी साठा अशी कामे होणे गरजे आहे. फलटण तालुक्यात अनेकजण सक्ती नसताना ठिंबक सिंचनकडे वळलेली आहेत. स्वतः होवून केलेल्या बदलाचेही स्वागत करायला पाहिजे. शेतकऱ्यांतील ऊसाची एक प्रकारची क्रेझ नियंत्रणात आणली पाहिजे. जलसंवर्धन व पाणीसाठा  यासाठी वेळ पडल्यास सक्ती करावी लागेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com