ramraje comment on political enemy | Sarkarnama

राज्यात नाही पण सातारा जिल्ह्यातच माझ्यासमोर शत्रूंची फौज : रामराजे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

कै. चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी कधीच खालच्या थराला जाऊन राजकारण केलं नाही. -रामराजे नाईक निंबाळकर

फलटण :  राजकारणात नावारूपाला येणयासाठी मी 25 वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे फलटण, खंडाळ्याला औद्योगिक क्रांती झाली. मग साताऱ्याला का नाही झाली. धोम बलकवडीचे पाणी फलटणला आले, मग माणला का पाणी आले नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून राज्यात नाहीत पण सातारा जिल्ह्यातच माझ्या समोर शत्रुंची मोठी फौज आहे, असा गौप्यस्फोट विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला. 

फलटणच्या भुमिगत गटार योजनेच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. 

रामराजे म्हणाले, आघाडी होऊ अन्यथा युती, आपली दुश्‍मनी त्यांच्याच बरोबर राहणार आहे. फलटण तालुक्‍यात कोण राहिले नसल्याने कोण घाटावरून आणतंय तर कोण सातारवरून येतंय. आपल्याकडे छोटे मोदी, चोक्‍सी, मल्ल्या असे अनेकजण आहेत. यामुळे मी कोणाचं नाव घेत नाही. पुण्यात काय केलं ते मला विचारून केलं का. ते त्यांच्या मरणाने मरतील, मला काही घेणं देणं नाही. मी मोठा आहे, मी दबाव आणला असे म्हणता मग आमच्यावर ऍट्रॉसिटी कोणी केली. तुमच्या मागे मुख्यमंत्री होते तर त्यांना फलटणचा विकास का करता आला नाही, हे सांगा.

संबंधित लेख