ramraje about udyanrajes ncp ticket | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आम्ही पवारांना बांधील, उदयनराजेंना नाही : रामराजे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 मे 2018

"साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली, याची शरद पवार साहेबांकडून आम्ही माहिती घेऊ शकतो. आम्ही दुसरे कोणाला नाही केवळ पवार साहेबांशी बांधिल आहोत ', या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. 

सातारा: "साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली, याची शरद पवार साहेबांकडून आम्ही माहिती घेऊ शकतो. आम्ही दुसरे कोणाला नाही केवळ पवार साहेबांशी बांधिल आहोत ', या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. 

जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. "कोणी किती विरोध केला तरी माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल आहे. गल्लीतील गोंधळापेक्षा मी दिल्लीतील निर्णयाला महत्व देतो ', या उदयनराजेंच्या वक्‍त्याव्य बाबत विचारले असता ते म्हणाले, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय स्वतः पवार साहेब घेतील. त्यांच्या विचाराशी आम्ही बांधील आहोत. कर्नाटक राज्यातील निकालानंतर शरद पवार साहेब राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतील. त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हाला ही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे विधान करत उदयनराजेंचे नाव न घेता टीका केली. 

संबंधित लेख