ramraje about satara loksabha election | Sarkarnama

सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास केव्हाही तयार : रामराजे  

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

डोक्‍यात खासदारकी नाही, मात्र

लोणंद (सातारा): 'खंडाळा माझाच तालुका आहे. पक्षाने जबाबदारी दिलीतर बघू. सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास आपली केव्हाही तयारी आहे', असे संकेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिले. 

खंडाळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल (सोमवारी) खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजीत अभिष्टचिंतन सोहळा व नागरी सत्कार कार्यक्रमात सभापती रामराजे बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खंडाळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, महानंदाचे उपाध्यक्ष डी.के पवार, सुभाषराव शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य उदय कबुले उपस्थित होते. 

सभापती रामराजे म्हणाले, खंडाळा माझा तालुका आहे. डोक्‍यात खासदारकी नाही, मात्र पक्षाने जबाबदारी दिली तर पुढे बघू. खासदारकीच्या रिंगणात केव्हाही उतरण्याची आपली तयारी आहे.  

संबंधित लेख